Price: [price_with_discount]
(as of [price_update_date] – Details)
From the Publisher
The Richest Man In Babylon : (द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन) Marathi Translation of International Bestseller
“मला हवं ते मिळविण्यासाठी
मला सर्वप्रथम संपत्ती कशी मिळवतात
याचा अभ्यास करावा लागेल,
त्यासाठी वेळ द्यावा लागेल.”
जॉर्ज सॅम्युएल क्लॅसन यांचा जन्म 7 नोव्हेंबर, 1874 मध्ये मिझौरी येथील लुवीझियाना येथे झाला. नेब्रास्का विश्वविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि स्पॅनिश-अमेरिकन युद्धात, ते अमेरिकन आर्मीमध्ये नोकरी करून सहभागी झाले होते. त्यांच्या प्रदीर्घ प्रकाशन व्यवसायाची सुरुवात त्यांनी डेन्व्हर कॉलरेडो येथे क्लॅसन मॅप कंपनी या प्रकाशन संस्थेची स्थापना करून केली. अमेरिका आणि कॅनडा या देशांच्या रस्त्यांच्या नकाशाचे पहिले पुस्तक प्रकाशित करून त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. 1926 मध्ये त्यांनी काटकसर आणि आर्थिक यश यासंदर्भातील एक पत्रकांची मालिका प्रकाशित केली आणि अल्पावधीतच ती अत्यंत प्रसिद्ध झाली, त्यातील प्रत्येक मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी पौराणिक शहर बॅबीलॉनमधील नीतिकथेचा आधार घेतला. बँका आणि विमा कंपन्यांनी त्यांच्या पत्रकांचे मोठ्या प्रमाणात वितरण केले, त्यामुळे जॉर्ज क्लॅसन हे नाव लाखो लोकांना परिचित झाले. प्रस्तुत पुस्तकाचे शीर्षक असलेले ‘बॅबीलॉनचा धनाढ्य’ हे त्या अनेक प्रसिद्ध पत्रकांपैकी सर्वांत लोकप्रिय बोधकथेचे पुस्तक आहे. ‘बॅबीलॉनच्या नीतिकथा’ या आजच्या काळातही अत्यंत प्रेरणादायक आणि श्रेष्ठ कथा ठरल्या आहेत.
‘हे पुस्तक आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक यशाच्या संदर्भातले आहे. आपले प्रयत्न आणि कुवत या दोन्हींच्या एकत्रित प्रयत्नातून मिळवलेले साध्य म्हणजे यश म्हणता येईल. त्यासाठी योग्य ती तयारी हेच यशाचे खरे गमक आहे. आपली कृती आपल्या विचारांपेक्षा कधीही श्रेष्ठ असू शकत नाही आणि आपले विचार आपल्या समजुतीपेक्षा श्रेष्ठ नसतात. या पुस्तकात सांगितलेले रिकाम्या बटव्याच्या खबरदारीचे उपाय हे आर्थिक समृद्धीसाठी मार्गदर्शक ठरले आहेत आणि खरं म्हणजे, तोच या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे; ज्यांना आर्थिक यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आहे त्यांना संपत्ती मिळवण्यासाठी मदत करणे, संपत्तीचे रक्षण करणे आणि अधिक संपत्ती मिळवण्यासाठी संपत्ती वर्धित करण्याचे उपाय हे पुस्तक सांगते.’
– जॉर्ज एस. क्लॅसन
तुमचे भविष्य तुमच्यासमोर एखाद्या दूरवर जाणार्या रस्त्यासारखे पसरलेले आहे. या रस्त्यावर तुम्हाला प्राप्त करायच्या असलेल्या महत्त्वाकांक्षा आहेत… आनंद देणार्या तुमच्या इच्छा आहेत.
तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही संपत्ती कमावण्यामध्ये यशस्वी व्हायला हवे. या पुस्तकात स्पष्ट केलेल्या आर्थिक तत्त्वांचा उपयोग करून तुम्ही संपत्ती प्राप्त करण्यामध्ये यशस्वी होऊ शकता. तुमच्या रिकाम्या बटव्यामुळे असलेल्या चणचणीच्या परिस्थितीपासून दूर जाण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला पूर्णतः मार्गदर्शक ठरेल आणि एक आनंददायक आणि समृद्ध आयुष्य तुम्हाला तुमच्या पैशांनी फुगलेल्या बटव्यामुळे मिळू शकेल.
गुरुत्वाकर्षणाच्या कधीही न बदलणार्या नियमाप्रमाणेच, संपत्तीच्या संदर्भातील मार्गदर्शक नियम हे वैश्विक आणि कधीही न बदलणारे, अपरिवर्तनीय आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे तुम्हालाही लाभकारी ठरो. जसे की, ते इतर अनेकांना त्यांच्या पैशांनी भरलेल्या बटव्यासाठी, भरपूर बँक बॅलन्ससाठी आणि आनंददायक आर्थिक प्रगतीसाठी लाभकारी ठरलेले आहेत.
सोन्याचे पाच कायदे
जी व्यक्ती आपल्या पुढील भविष्यासाठी, संपत्ती कमावण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या एकूण कमाईतून एकदशांश भाग वेगळा काढून ठेवते तिच्याकडे सोने आनंदाने येते आणि वृद्धिंगत होते.जी व्यक्ती सोन्याची फायदेशीर उद्योगात गुंतवणूक करते, त्या व्यक्तीसाठी सोने मेहनतीने आणि समाधानाने काम करते, त्यामुळे शेतातील पिकं जशी वाढतात अगदी तशाच पद्धतीने त्याच्याजवळचं सोने अनेक पटींनी वृद्धिंगत होते.जी व्यक्ती सोन्याचे काळजीपूर्वक संरक्षण करते आणि शहाण्यासुरत्या माणसांच्या सल्ल्यावरून त्यांची गुंतवणूक करते ते अशा व्यक्तींकडे टिकून कायमस्वरूपी राहते.जी व्यक्ती सोने माहिती नसलेल्या किंवा तज्ज्ञांनी प्रमाणित न केलेल्या एखाद्या धंद्यात किंवा तशा एका योजनेत गुंतवते अशा व्यक्तीच्या हातून सोने अलगद निसटून जातेजी व्यक्ती सोने प्राप्ती न देणार्या अशा अव्यवहारी गुंतवणुकीत गुंतवते किंवा लबाड आणि कारस्थानी लोकांच्या भुरळ पाडणार्या शब्दांना भुलून गुंतवणुकीतून काल्पनिक अशा फायद्याचे स्वप्नरंजन करते, स्वतःच्या अनुभवशून्यतेवर विसंबून भरमसाट संपत्तीचे काल्पनिक स्वप्नरंजन करते अशांच्या हातून सोने निसटण्याची शक्यता अधिक असते.
तुमच्या श्रीमंत होण्याच्या अपेक्षांमध्ये तुमची जादुई शक्ती दडलेली आहे, सोन्याच्या पाच कायद्याच्या ज्ञानाने या शक्तीला योग्य वळण द्या आणि बॅबिलॉनमधील संपन्नतेचा भागीदार व्हा.’’
‘‘प्रत्येक व्यक्ती बालपणाकडून वृद्धापकाळाकडे जात असते. तो मार्ग कोणालाही चुकलेला नाही किंवा त्या मार्गावरून वेगळे वळण आपल्याला घेता येत नसते. त्यामुळं मी असं म्हणेन प्रत्येक व्यक्तीनं वृद्धापकाळासाठी योग्य ती रक्कम बाजूला काढून ठेवायला हवी. जेव्हा तो म्हातारपणामुळे कमाई करू शकणार नाही किंवा या जगातून जाईल, तेव्हा त्याच्या पश्चात कुटुंबाच्या सुखासाठी आणि मदतीसाठी त्यानं पूर्वतयारी केली पाहिजे. आजचा धडा हा की, जेव्हा तुम्ही कमाई करण्यायोग्य राहणार नाही, तेव्हाही बटवा भरलेला राहण्यासाठी मी मार्गदर्शन करणार आहे.’’
‘‘ज्याला संपत्ती कमावण्याचे नियम समजलेत, ज्याला संपत्ती वृद्धिंगत करण्याचे ज्ञान प्राप्त आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या भविष्याची तरतूद करून ठेवणंही गरजेचे आहे. त्यानं काही प्रमाणात भविष्यासंदर्भात गुंतवणुकीचे नियोजन आणि येत्या काळासाठी सुरक्षितता म्हणून काही तजवीज केली पाहिजे. अशी दूरदर्शीपणे गुंतवलेली रक्कम वेळप्रसंगी उपलब्ध करता आली पाहिजे.
जॉर्ज सॅम्युएल क्लॅसन
जॉर्ज सॅम्युएल क्लॅसन यांचा जन्म 7 नोव्हेंबर, 1874 मध्ये मिझौरी येथील लुवीझियाना येथे झाला. नेब्रास्का विश्वविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि स्पॅनिश-अमेरिकन युद्धात, ते अमेरिकन आर्मीमध्ये नोकरी करून सहभागी झाले होते. त्यांच्या प्रदीर्घ प्रकाशन व्यवसायाची सुरुवात त्यांनी डेन्व्हर कॉलरेडो येथे क्लॅसन मॅप कंपनी या प्रकाशन संस्थेची स्थापना करून केली. अमेरिका आणि कॅनडा या देशांच्या रस्त्यांच्या नकाशाचे पहिले पुस्तक प्रकाशित करून त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला.
1926 मध्ये त्यांनी काटकसर आणि आर्थिक यश यासंदर्भातील एक पत्रकांची मालिका प्रकाशित केली आणि अल्पावधीतच ती अत्यंत प्रसिद्ध झाली, त्यातील प्रत्येक मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी पौराणिक शहर बॅबीलॉनमधील नीतिकथेचा आधार घेतला. बँका आणि विमा कंपन्यांनी त्यांच्या पत्रकांचे मोठ्या प्रमाणात वितरण केले, त्यामुळे जॉर्ज क्लॅसन हे नाव लाखो लोकांना परिचित झाले. प्रस्तुत पुस्तकाचे शीर्षक असलेले ‘बॅबीलॉनचा धनाढ्य’ हे त्या अनेक प्रसिद्ध पत्रकांपैकी सर्वांत लोकप्रिय बोधकथेचे पुस्तक आहे. ‘बॅबीलॉनच्या नीतिकथा’ या आजच्या काळातही अत्यंत प्रेरणादायक आणि श्रेष्ठ कथा ठरल्या आहेत.
Publisher : Saket Prakashan Pvt. Ltd.; First edition (9 June 2021); Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Language : Marathi
Paperback : 200 pages
ISBN-10 : 9352203240
ISBN-13 : 978-9352203246
Item Weight : 110 g
Dimensions : 20.8 x 13.8 x 0.8 cm
Country of Origin : India
Net Quantity : 1 Count
Importer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Packer : Saket Prakashan Pvt. Ltd. 115, Mahatma Gandhi Nagar, Station Road, Aurangabad 431005, Maharashtra, India, 9881745605
Generic Name : Book
[ad_2]